Saturday, 14 May 2016

माझा ज्ञानराचानावादी उपक्रम

1) ब्यानर माझा फळा :-
                   मित्रानो आपणाकडे जुने ब्यानर खूप पडलेले असतील.जे शाळेसाठी सध्या उपयुक्त नाहीत असे ब्यानर त्यातून निवडा व त्यांचे 1 फुट लांबी व 1 फुट रुंदी असणारे चौरस तयार करा,व कात्रीने कापून घ्या  व कापलेल्या भागांना काळा रंग द्या.मग तयार होईल माझा फळा. हा फळा छोटासा असेल,प्रत्यक मुलास अथवा गटास देता येईल.हा जास्त काळ टिकेल. पाटी सारख खराब होणार नाही अथवा फुटणार सुद्धा नाही. जर या ब्यानर फळा काही दिवसानंतर फिक्कट होत गेला तर 100ml मध्ये परत रंगवा.व हा फळा जास्त काळासाठी वापरत रहा.
1) आकार कमी  2) खर्च फारच कमी  3) हाताळण्यास सोपा. 4) पुनःपुन्हा वापरता येईल 5) लवची असल्याने गुंडाळून ब्याग मध्ये ठेवता येईल.

आवश्यक तेवढेच पाणी वापरा

मित्रानो या सुट्टी मध्ये आवश्यक असेल तेवढेच पाणी वापरा व पाण्याचा अपव्यय टाळा.
      1) पाणी वाचवणार .
      2) मिळतील त्या फुलझाडांच्या किंवा फळझाडांच्या बिया शेतात,रस्त्याच्या कडेला अथवा मोकळ्या जागेत नक्की टाकणार ...
      3) खूप आवांतर वाचन करणार...
                          हे आहेत माझे सुट्टीतील उपक्रम