आमचे उपक्रम

1)जून :-

                    १)नवागताचे स्वागत :-

दि.१५/०६/२०१५ या दिवशी नव्यानेच दाखल होणाऱ्या इयत्ता पहिलीतील मुलांचे स्वागत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,पालक ,व मुख्याध्यापक श्री.साबळे सर यांनी पुष्पगुच्छ ,पुष्प,देवून केले .या समई सर्व मुलांना गोळ्या व चॉकलेट देवून हा उपक्रम पार पाडण्यात आला.

                     2)वृक्षारोपण उपक्रम :-

दि.२५/०६/२०१५ रोजी smc अध्यक्ष श्री.हिरामण अ.भांगरे,उपसरपंच श्री.आनंदा भांगरे,काकडू पवार ,परशुराम भांगरे,सोनू दरोडे,भिवा भांगरे,गणपत भांगरे व  इतर वृक्षरोपण प्रसंगी हजर होते .तसेच श्री.साबळे सर व ग्रामस्थ ,पालक यांनी विविध प्रकारची फुलझाडे व फळझाडे लावली.

2)जुलै:-

                        3)मातीपासून विविध वस्तू बनवणे :-

प्रथम चिखल कसा करावा व माती कोनती निवडावी हे सांगण्यात आले.तदनंतर शाळेच्या प्रांगणात चिखल बनवला व शिक्षक,विध्यार्थी,पालक असे सर्वांनी मिळून मातीच्या वस्तू बनवल्या .त्यामध्ये घरगुती वस्तू ,शेतीची अवजारे ,खेळाचे साहित्य,प्राणी ,पक्षी  इत्यादी .तसेच मुलांना घरुनसुद्धा काही वस्तू बनवून आणण्यास सांगण्यात आले.  अशा प्रकारे हा उपक्रम पार पाडण्यात आला.

                            4)भाताची लागवड :-

शाळेतील सर्व मुलांना प्रत्यक्ष भाताच्या रोपांच्या ठिकाणी नेण्यात आले व रोप विषयी माहिती सांगण्यात आली ,नंतर प्रत्यक्ष नांगर हातात घेवून शेत नागर्ण्यात आले,तसेच आळवट घेवून बैलाच्या सहायाने भट लावण्याच्या ठिकाणी गाळ करवून दाखवण्यात आला व मुलांना सुद्धा सहभागी करवून घेतले.गाळ झाल्या नंतर भाताचे रोप उपटवून भाताची लागवड सर्व मुलांनी केली.
 या उपक्रमाच्या अंमलबजावणी साठी smc सदस्य श्री.यशवंत भांगरे,शेतकरी काशिनाथ व त्याची पत्नी चांगुणा,उपसरपंच श्री.आनंदा भांगरे,शिक्षक श्री.साबळे सर व श्री.जाधव सर यांचे सहकार्य मिळाले.

3)ऑगस्ट:-

                          5)मातीच्या वस्तूंचे प्रदर्शन :-

दि 4/०८/2015 या दिवशी शाळेतील विध्यार्थ्यानी बनवलेल्या मातीच्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले.या प्रसंगी विध्यार्थी ,शिक्षक ,पालक  आदी उपस्तीत होते.


                         6)लेखन साहित्य वाटप:-

दि १५/०८/२०१५  या दिवशी भारताच्या स्वतंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेतील सर्व मुलांना पालक व गावकरी यांच्या सहकार्यातून वह्या ,पेन्सील,पेन. आश्या लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले.
                        

                          7)रक्ष्या बंधन उपक्रम:-

दि 2९/०८/२०१५  या दिवशी सर्व विध्यार्थी यांना या सणाचे महत्व श्री.जाधव सर यांनी सांगितले .त्या नंतर सर्व मुलीनी वर्गातील मुलांना राख्या बांधल्या.अश्या प्रकारे हा उपक्रम पार पाडण्यात आला.


4)सप्टेंबर:-

                                 8)फुलांच्या माळा बनवणे :-

दि 4/09/2015 या दिवशी म केंद्रप्रमुख यांच्या उपस्थितीत फुलांच्या माला बनवणे हा उपक्रम घेण्यात आला.या प्रसंगी मुलांनी विविध प्रकारच्या माळा बनवून वर्गातील महामानवांच्या फोटो ना घातल्या तसेच दरवाज्यास माळ लावण्यात आली व उपक्रम पार पाडण्यात आला .

No comments:

Post a Comment