शिक्षकाचे नाव :-श्री.राहुल वामनराव साबळे
-शिक्षण :बी.ए(eng). डी.एड.
शाळा:-जि.प.प्राथमिक शाळा चिरेपाडा
नोकरी रुजू तारीख :-१२/०१/२००९
मूळ पत्ता :-मु.पो.अहमदपूर तालुका-अहमदपूर जिल्हा-लातूर पिन -४१३५१५
थोडक्यात माझ्या विषयी :-
मला वाचनाची बऱ्यापैकी आवड आहे .माझे आवडते लेखक ओशो,व.पु.काळे,शिव खेरा,निरंजन घाटे,अ.हा.साळूके,बाबुराव बागुल,डॉ.आंबेडकर.कथा आवडतात त्या बाबुराव बागुल,व आण्णाभाऊ साठे यांच्या.तसेच कविता वाचण्याची व गुणगुणण्याची सवय आहे.कवी म्हन्साल तर कुमार विश्वास यांची पगली लडकी ,बस्ती बस्ती घोर उदासी ,पर्वत पर्वत खाली पण....अश्या अनेक,मराठी मधील फ.मु.शिंदे याची गावाकडे चल माझ्या दोस्ता ,माय,बाप,व इतर,ज्ञानेश वाकुडकर यांची तुझ्या टपोर्या डोळ्यात माझ इवलस गाव ,मंगेश पाडगावकर यांच्या सर्व (सलाम),मराठी व हिंदी गाझालींचा मी दिवाण आहे.मराठीतील सुरेश भट यांच्या गझला ह्या भावस्पर्शी आहेत. हिंदी तील गालीब.गोष्टी खूप आवडतात त्या मुल्ला नसरुद्दिन यांच्या .
संत कबीर खूप ग्रेट ,नेपोलियन दृढ निश्चई,युद्धात सुधा हा व्यक्ती पुस्तक वाचत असे,ओशो जगातील सर्वात विद्रोही महामानव(1५०००० पुस्तकाचे वाचन करून जगाला हादरून सोडणारी व्यक्ती म्हणजे ओशो).छ.शाहू महाराज. सर्वाना समान वागणूक मिळावी म्हणून अविरत झटलेला बहुजनांचा राजा ,मीरा निस्वार्थी व स्वच्छ प्रेम.सॉक्रेटीस तत्त्वज्ञान,डॉ.आंबेडकर बहुजनांचा कैवारी.पेरियार यांची नास्तिकता.बुद्ध,महावीर,गुरुनानक ,कृष्ण,या व आशा महामावांचा माझ्या मनावर प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे.
मी छान चित्र काढू शकतो.भाषणाची कला अवगत करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे.मित्रानो मला येत नाही पोहायला व सुंदर अक्षर काढायला.
मला डायरी लिहिण्याची आवड आहे .माझ्या वयक्तिक 3 डायऱ्या आहेत .त्या मध्ये मी कविता लिहितो,आवडलेले विचार लिहितो ,पुस्तकाचा सारांश लिहितो,जसा वेळ मिळेल तसे माझ्या आयुष्यात घडलेल्या घडामोडी लिहित असतो.
मला खूप जीव भावाची मित्र लाभलेली आहेत .त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळत आहे.मी त्यांचा व आपल्या सर्वांचा ऋणी आहे.
*धन्यवाद *
No comments:
Post a Comment