जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरेपाडा ही शाळा चिरेपाडा या गावात वसलेली आहे.चिरेपाडा हे गाव तीन छोटे छोटे पाडे मिळून बनलेले आहे. या गावाची लोकसंख्या ३६३ एवढी आहे.या गावात बरोबर मधोमध शाळा आहे .शाळेच्या उत्तर बाजूस मारुती मंदिर आहे.दक्षिण बाजूस डोंगरशेत हे गाव आहे.पूर्वेस मानकापूर व पश्चिम ला घोटविहीरा हे गाव तसेच दमणगंगा ही अतिशय सुंदर नदी मनमोहक रित्या वाहते.गावाचा विचार केला तर मोठया डोंगराच्या कुशीत अतिशय निसर्गरम्य वातावरणात हे गाव आहे.
गावास दळणवळण सुविधा फार खडतर आहे.जुनी जाणती माणसे असे सांगतात कि १९७२ च्या दुष्काळात हा चीरेपाडा रस्ता मंजूर झाला व तो २०१४ ला खडी मिक्स थोडे डांबर टाकून पूर्ण झाला व आज तुम्ही मी दुचाकीवर जाऊ येऊ शकतो .
या गावात शाळेची स्थापना झाली ती 1992 ला.एकेकाळी कमी पटाची शाळा म्हणून या शाळेची अवहेलना होत असे ,पण आज याच शाळेचा पट ३६ असून इयत्ता 1 ली ते 5 वी चे वर्ग सुरु आहेत .या शाळेचे मुख्याध्यापक श्री.राहुल वामनराव साबळे हे आहेत.तसेच श्री.कुंदन विजय जाधव हे कृतीशील शिक्षक जोडीला आहेत .गावकर्यांनी शाळेच्या शैक्षणिक भरारी मुळे शाळेस संगणक व प्रिंटर भेट म्हणून दिलेले आहे.गावातील शेतकरी ,कामगार,पालक,माजी विध्यार्थी यांनी मोलमजोरी करून पैसे उभारून शाळेस हे साहित्य उपलब्ध केले आहे.
१००% आदिवासी असलेली व digital शिक्षण देणारी ही शाळा आहे ,या शाळेत कोणी मदत करू इच्छीतअसल्यास नक्की करू शकता. आणि
हो शाळेला एकदातरी नक्की भेटा.
धन्यवाद...

No comments:
Post a Comment