Monday, 14 September 2015

द्या पवार.

दया पवार (इ.स. १९३५ - सप्टेंबर २०१९९६) हे मराठी साहित्यिक होते. मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात.
दया पवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार. त्‍यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव नावाच्या खेड्यात जन्मले. संगमनेरच्या बोर्डिंगमध्ये राहून ते शिक्षण पूर्ण करीत होते. त्याला किंवा त्याच्या आईला न विचारता दगडूच्या चुलत्याने दगडूचे लग्न ठरवले. त्यामुळे विचलित होऊन दगडू मॅट्रिकमध्ये नापास झाले. इंग्लिशमध्ये त्यांना पास होण्यासाठी सात मार्क कमी पडले. त्याच्या मामाने आणि आईने त्यांना धीर दिला आणि ऑक्टोबरच्या परीक्षेला बसवले. बोर्डिंगच्या अधिकार्‍यांनीही दगडूला अपवाद म्हणून बोर्डिंगमध्ये राहण्याची परवानगी दिली. मुलांच्या चिडवण्याचा त्रास होई म्हणून दगडू बोर्डिंगजवळच्या एका कोंबडीच्या खुराडात बसून अभ्यास करू लागले. इतका अभ्यास केला की दया पवार यांना इंग्रजीमध्ये ६३ मार्क मिळाले.
मग दया पवार यांनी आयुष्यात कधीच मागे वळून पाहिले नाही. एकेकाळी मॅट्रिक नापास असलेल्या दया पवार यांना पद्मश्री मिळाली.
दया पवार यांच्या ’बलुतं’ या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत. बलुतं हे मराठीतले दलित लेखकाने पहिले प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाने मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली.
दया पवार यांची मुलगी प्रज्ञा ही एक मराठी कवयित्री आणि गद्यलेखक आहे.
दया पवार
जन्म नावदगडू मारुती पवार
टोपणनावदया पवार
मृत्यूसप्टेंबर २०१९९६
दिल्लीभारत
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकादंबरी
चळवळमराठी दलित साहित्य
प्रसिद्ध साहित्यकृतीबलुतं
वडीलमारुती

No comments:

Post a Comment