आनंदाचे गाणे
चला चला ...गाऊ चला ..आनंदाचे गाणे
आनंदाचे गाणे गाऊ .आनंदाचे गाणे ||धृ ||
फुल पाखरांचे पंख घेऊनी,उडू बागडू धुंद होऊनी
वाऱ्यासंगे... नाचू चला... छेडूया तराणे
आनंदाचे गाणे गाऊ .आनंदाचे गाणे||1||
फुला फुलांचे रंग घेउनी ,झाडे जशी उंच तशी उंच होऊया
हिरवे हिरवे ...रान सारे... हिरवी हिरवी पाने
आनंदाचे गाणे गाऊ .आनंदाचे गाणे||2||
आभाळात काहीतरी नवे पाहूया ,नवे नवे पाहताना नवे शोधूया
गीत नवे ...शब्द नवे ...गाऊ या नव्याने
आनंदाचे गाणे गाऊ .आनंदाचे गाणे||3||
Thanks. It's helped me.
ReplyDeleteThank-you sir ji ... I found my favourite song here.
ReplyDelete