Friday, 2 October 2015

महात्मा गांधी जयंती उत्सहात साजरी

           आज दि.२ ऑक्टोंबर महात्मा गांधी यांची जयंती.त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी . त्यांचा जन्म गुजराथ मधील पोरबंदर या गावी झाला.त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई .जन्म २ ऑक्टोंबर १८६९ ला झाला.त्यांचा विवाह कस्तुरबांशी झाला.

           कांगडी गुरुकुलाचे “आचार्य श्रद्धानंद “यांनी महात्मा ही पदवी दिली.त्यांची सत्य व अहिंसा ही शिकवण होती.”बुरा मत देखो ,बुरा मत कहो ,बुरा मत सुनो “ हा संदेश महात्मा गांधीनी दिला.त्यांची हत्या ३० जानेवारी १९४८ रोजी वार शुक्रवार संध्याकाळी ५:३० वाजता झाली.

1 comment:

  1. महात्मा गांधी की जय.

    ReplyDelete